कसं काय येथे हे वाचायला मिळाले:
हो ना करता करता चॆपेल बाईंकडून बर्थ सेंटरमधे बदली करून घेतली, तेव्हा २८ वा अाठवडा सुरू होता. तिथे मग नियमित तपासण्या सुरू झाल्या होत्या. बर्थ सेंटरमधे तपासणी फारच चांगल्या पद्धतीने व बराच वेळ चालायची. साधारण ३० व्या अाठवड्यात पोटात हालचाल जरा जास्तच होतेय असं लक्षात अालं. बाळ लवकर येणार अाहे, बांधकाम अाटपव असं नवऱ्याला सांगून पाहिलं पण काsही उपयोग झाला नाही. पहिलं बाळ सहसा उशीरा येतं, म्हणजे अापलंही उशीराच येणार अाहे असं मला समजावून त्याने अाणखी कामांच्या यादीत भर टाकली!!!!