विनायक,
पटले तुमचे, पण एवढा सूक्ष्म विचार आजकाल कोण करतो हो? नव्या लेखकांना आपले लेखन केव्हा एकदा ओकतोय याची घाई झालेली असते. मजकूर तपासून बघणे नाही, लेखनाच्या मसुद्यावर पक्का हात फिरवणे नाही, शुद्धता-अशुद्धतेचे भान नाही. अहो! बोलताना जिथे आपले लोक इंग्रजाळलेली मराठी (मिंग्रजी) सर्रास वापरतात तेथे लेखनाकडून अपेक्षाच बाळगणे चूक. बरं आपल्याला प्रतिशब्द ठाऊक नाही तर जाणत्यांना विचारून तरी घ्यावे की नाही? पण तेही नाही. भाषेबाबतची ही अनास्थाच मराठी संस्कृतीच्या ऱ्हासाचे कारण ठरत आहे. तुमच्या वरील विचारांशी पूर्णपणे सहमत आहे.