माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
अमित,अविनाश आणि रोहन हि मोठ्या घराची बिघडलेली मुल रात्री १० वाजता बार मधून जेवण करून बाहेर पडली आणि आपल्या कार जवळ आली. रोहन ने चाबी काढून दरवाजा उघडायचा प्रयत्न केला तितक्यात एक भिकारी धावत धावत त्य्नाच्या जवळ आला.”ओ साहेब, मला खूप भूक लागली आहे हो. दोन दिवसांपासून जेवण केलेलं नाही.”
अमित,”आम्ही काय करायचं. तुला काम धंदा करता येत नाही का?.”
अविनाश म्हणाला”अरे यार याला काही तरी देऊन टाका आणि जाऊ द्य्ता. उगाच डोक कशाला लावता त्याच्या सोबत.” आणि त्याने खिश्यातून ५ रुपये काढून त्याच्या ता दिले. त्या भिकार्याने ते पैसे घेतले ...
पुढे वाचा. : चोरी आणि सिनाजोरी