sahaj-suchala-mhanun येथे हे वाचायला मिळाले:
सवयीने घड्याळाकडे नजर गेली. नऊ वाजले, म्हणजे 'ती' आता बसस्टॉपवर उभी असेल तिच्या मैत्रिणींबरोबर. घरातून निघून गाडीत बसल्याबरोबर मन तिचाच विचार करायला लागतं आजकाल. बसस्टॉप जवळ आला, की आपसूकच लक्ष घड्याळाकडे जातं.
ती दिसायला काही खूप सुंदर नाही, तरी तरतरीतपणा जाणवतोच. केस थोडेसे पोनीटेलमधून बाहेर आलेले, कपाळावर टिकली, क्वचित कधी साडी... म्हणजे सणासुदीला. एरवी सलवारसूट किंवा ट्राउझर आणि थोडा लाँगच कुर्ता अशीच असते ती. एखाददिवशी हलकी लिपस्टिक. एका हातात दोन बांगड्या... बहुतेक सोन्याच्या असाव्यात नि एका हातात घड्याळ, बस बाकी काहीच मेकअप ...
पुढे वाचा. : ती...स्वप्नपरी..!