दिलीप वसंत सामंत, योगप्रभू, नरेंद्र आणि जालसर्वज्ञ

प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार.

जालसर्वज्ञ

मूळ कथा लांबलचक आहे हे मान्य केले तरी इंग्रजी शब्दांचे प्रमाण बरेच जास्त आहे ही वस्तुस्थिती राहतेच.  "ही वाक्ये पात्रांच्या तोंडचे संवाद आहेत, लेखकाची वाक्ये नाहीत" हा बचाव पटणारा नाही. कथा मराठी भाषेत असेल तर संवादही  मराठीत असावेत. ह. मो. मराठे यांची काही पुस्तके अशा देवनागरी भाषेतल्या इंग्रजी संवादांनी भरलेली असतात त्यावरही टीका झाली होती.

विनायक