"रांगोळीत असे वलयांकृत वेलांट्या
घरातील सुखदुःखाच्या जशा लाटा
रांगोळीत असती अनेक रंग छटा
घरातील लोकांच्या मनातील वाटा

रांगोळी असते,  घराचा हो आरसा
आनंद विलसतो,  त्यात  छानसा
रांगोळी देते हळुच घराचा कानोसा
घरातील आनंदाचा रांगोळी वारसा"                               .... हे आवडले !