विभक्तिप्रत्यय आणि क्रियापदाची रूपे (क्रियापदे नव्हे) जोवर मराठीच्या व्याकरणानुसार आहेत तोवर ती वाक्ये मराठीच आहेत असे म्हणायला हवे, असे मला वाटते. तरी इतरभाषिक शब्दांचे प्रमाण कमी असायला हवे हेही खरेच.  जेव्हा मूळ परिस्थितीत संवादच्या संवाद इतरभाषेत असतात तेव्हा कथेत ते संवादाच्या रूपाने लिहिण्याऐवजी वातावरण निर्मितीसाठी एक दोन वाक्ये तशी (संवादाच्या स्वरूपात) लिहून इतर भाग निवेदनाने (म्हणजे लेखकाच्या शब्दात) लिहावा असे मला सुचवावेसे वाटते. (अर्थात हे केवळ कथा कादंबऱ्यांतच शक्य आहे. नाटकात असे करता येणार नाही.)