वरील चर्चेत परिभाषिक शब्दांचे मराठी प्रतिशब्द आपल्याला किती प्रमाणात येतात किंवा सूचतात हे पडताळून बघण्याकरता एक प्रयत्न.
१. कोटेशन - निविदा
२. प्रॉडक्शन - उत्पादन
३. सेल्स - विक्री
४. परचेस - खरेदी
५. मॅडम - बाई
६. ऍडिशनल - जादाची
७. फिगर्स - आकडेवारी
८. नो प्रॉब्लेम - काहीच हरकत नाही
९. स्टेटस - सद्यस्थिती
१०. व्हॅल्यू - किंमत/किंमती
११. बिझीनेस फर्स्ट - पहिला धंदा!
१२. डायरेक्टली - थेट
१३. मटेरियल - माल
१४. प्राईस - किंमत
१५. अर्जंट - त्वरित
१६. रूलखाली - नियमाखाली/नुसार
१७. डेली प्रॉडक्शन - रोजचे उत्पादन
१८. कॉपी - नक्कल
१९. आयकार्ड - ओळखपत्र
२०. परपझ ऑफ व्हिजीट - भेटण्याचा हेतू
२१. सेक्शन खाली - रकान्याखाली
२२. जस्ट अ कप ऑफ टी - चहा, अगदी थोडा!
२३. स्टाफ - नोकरदार वर्ग
२४. थर्स्टडे नाहीतर फ्रायडे - गुरवारी नाहीतर शुक्रवारी
२५. फॅक्टरीत - कारखान्यात
२६. काम पेंडिंग आहे - काम तुंबले आहे
२७. एरियामध्ये - भागामध्ये
२८. ओरिजिनल - मूळ
२९. रिझल्टस - निकाल/निष्पन्न
३०. हाय हॅलो - नमस्कार! कसे आहात?
३१. डिमांडस - मागणी
३२. प्लीज डु नॉट बी पर्सनल - तुम्ही व्यक्तिशहा काही घेऊ नका.
३३. रेअरली - क्वचित
३४. पेमेंट - भरणा
३५. ऍडव्हान्सेस - आगाऊ रक्कम
३६. व्हिजिलन्स - दृष्टीक्षेप?
३७. ऑफिस - कचेरी/कार्यालय
३८. एक्साईज - बहुतेक जकात
३९. बॉस - साहेब
४०. टॅक्स - कर
४१. डायरेक्टर - अधिकारी
४२. ड्यूटी - कामावर हजर/जबाबदारीची जाणीव
४३. डिपार्टमेंट - खाते
४४. इज इट ट्रू - खरं की काय! खरं आहे का हे?
४५. कॉंप्युटर - संगणक?