जी मुले आता १०/१२ वर्षाची आहेत त्यांना टीपकागद म्हणजे काय हे माहितीही नसेल! तसेच विजेचे दिवे, टेलिफोन इ. नसणे हे पण नव्या पिढीच्या कल्पनेच्या पलीकडचे आहे.....
हो आताच्या मुलांना कोळसा, विस्तव, शेकोटी, शेगडी या गोष्टी माहित नाहीच.
होम्सच्या गोष्टी वाचतांना १००/१२५ वर्षापुर्वीचा काळखंड उभा राहतो. घोडागाड्या, बग्ग्या, सरदार, पोलीस, सामान्य लोक, जहाजाचा प्रवास, होम्सने न्युयार्क ला तार पाठवुन माहिती मिळवणे, या गोष्टी वाचतांना आपण अक्षरशः खिळुनच जातो.
त्यातही होम्सची पध्दत आपल्याला खिळवुन ठेवते. उदा. गोंदण्याचा विषय असो, रक्ताचे थेंब असो, रासायनिक गुणधर्म असो तो वॅटसनला सांगतो यावरील तु माझा लेख वाच. कोणाची माहिती शोधतांना तो सांगतो, वॅटसन अरे "कोण आणि कोणाचे" खंड बघ बर, त्यात या व्यक्तिची माहिती मिळेल.
वाचतांना जो काही आनंद मिळतो तो खरोखर अवर्णनिय असतो हेच खरे.