विचारांच्या झुळुका येथे हे वाचायला मिळाले:

क्रिकेट या खेळाने खेळाडूंशिवाय किती तरी लोकांना आनंद दिलाय. किती लोकांच्या घरांत क्रिकेटमुळे चहातल्या कपात वादळे येऊन शांत झालेली आहेत. किती लोकांनी क्रिकेटवर लेखन करून इतरांना आनंद दिला आहे. किती लोकांनी त्या लेखनावर टीका करून त्याहून जास्त आनंद मिळवला आहे. तासन्तास क्रिकेटवर गप्पा मारलेल्या आहेत. आपल्याला क्रिकेटमधील कि हा र्‍हस्व की दीर्घ ही शंका असूनही खेळाडूंना त्यांचा खेळ कसा सुधरवता येईल यावर फुकटचे सल्ले दिलेले आहेत.

क्रिकेट हा कदाचित एकटाच खेळ असेल जो न खेळणारे हे खेळाडूंपेक्षा जास्त ज्ञानी असू शकतात (असे ...
पुढे वाचा. : क्रिकेटचा आनंद