आपल्या विवेचनाशी पूर्ण सहमत आहे. मी बिलिंग रेटस कमी करावेत हे लिहिल्यानंतर त्यातली चूक माझ्या लक्षात आली होती. आपण म्हणता ते बरोबरच आहे, शिवाय, नवीन धंदा सुरू करणाऱ्याला, बाबारे, तु हजार नको फक्त पाचशेच नफा कमव कारण ते देशाच्या फायद्याचे आहे, असं सांगणं केवळ हास्यास्पद आहे.
तरीपण, आयटी मुळे मध्यमवर्गात झालेली/आलेली आर्थिक तफावत, गॅप ह्यावर उपाय काय हा मूळ प्रश्न अनुत्तरितच राहतो.
ह्यावर जपानने स्वतःची प्रगती कशी केली ह्याचा कोणाचा अभ्यास असेल तर त्यावर प्रकाश टाकावा. कारण, युद्धानंतर जपानही गरीबच होता, निर्यात करून श्रीमंत झाला. आता ज्या क्षेत्रात निर्यात झाली फक्त तीच क्षेत्र पुढे आली असं नाही तर इतर क्षेत्र ही (डोमेस्टिक) पुढे आली. हे परिवर्तन कसं झाल? भारताबाबत तसं होऊ शकेल का वगैरे बाबींवर विचार व्हायला हवा...