वास्तवदर्शी लिखाणामध्ये पात्रांच्या तोंडचे संवाद कथेतल्या काळानुसार आणि पात्रांच्या सामाजिक, आर्थिक व व्यावसायिक परिस्थितीनुसार आहेत का ते पाहावे लागते. आपल्या यादीतले बरेचसे शब्द आता रूढ आहेत. त्यांऍवजी शुद्ध मराठी प्रतिशब्द दिल्यास ते कृत्रिम वाटेल. हे शब्द रूढ झाले याविषयी दुःख वाटू शकते, पण वास्तव दाखवायचे, तर ते स्वीकारावे लागतेच.