इन्कम टॅक्स - प्राप्तिकर (आयकर नाही. आय हा हिंदी शब्द आहे)
सेल्स टॅक्स - विक्री कर
एक्साईज टॅक्स - उत्पादन शुल्क (अबकारी हा जुना आणि निरर्थक शब्द आहे)
कस्टम ड्युटी - सीमाशुल्क
व्हिजिलन्स - दक्षता विभाग
एन्फोर्समेंट - अंमलबजावणी (पण जेव्हा डायरेक्टोरेट असते तेव्हा त्याला सक्तवसुली संचालनालय म्हणतात.)
व्हॅल्यू - मूल्य
कॉस्ट - शुल्क
प्राईस - किंमत
स्टाफ - कर्मचारी वर्ग
चेक -धनादेश
पेएबल - देय
ऍडव्हान्स - आगाऊ रक्कम (बँकिंगमध्ये कर्ज)
कस्टमर - ग्राहक
क्लाएंटेल - ग्राहक वर्ग
कन्सल्टंट - सल्लागार
अकाउंट - खाते (डिपार्टमेंट असेल तर लेखा विभाग)
अकाउंटंट - लेखापाल
कॅशियर - रोखपाल
व्हॅल्यूएशन - मूल्यांकन
पी आर - जनसंपर्क
एच आर - मनुष्यबळ (मानवी साधनसंपत्ती हे अधिक अचूक)
कंपल्सरी - सक्तीचे
मँडेटरी - अनिवार्य
कॉंप्लिमेंटरी - पूरक (खाद्य वगैरे) पण रजा, पैसे असतील तर ऐच्हिक
काँट्रिब्युशन - वर्गणी, (काम असेल तर योगदान)