माझे मत महेश यांच्यासारखे काहीसे आहे. की एखादा अगदीच खास शब्द (भाषांतरित केल्यावर मजा जाईल असा) मूळ भाषेत ठेवून बाकी मराठीत आणावे. संवादाची भाषा कोणती आहे याचा निवेदनात उल्लेख करावा. सहसा हिंदी व इंग्रजी सोडून इतर भाषेतील संवादांबाबत असेच केले जाते. कारण जसेच्या तसे लिहिल्यास अर्थ समजेलच असे नाही. पण या दोन भाषा वाचकाला येत असतील असे गृहित धरता येऊ शकते. त्यामुळे 'परभाषिक' असे वर्गीकरण झाले तरी लेखकाचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणून इंग्रजी हिंदी शब्द मराठीत येत असतात. किती प्रमाणात यावेत यावर लेखकाला वाटेल तितक्या हे एकच उत्तर शक्य आहे.

उदाहरणादाखल घेतलेल्या लेखात वातावरणनिर्मितीसाठी लेखकाने इंग्रजी हिंदी शब्दयोजना केली असावी. हवा तो परिणाम साध्य होतो का हे वाचकाने ठरवावे. 

परभाषिक शब्दांचे योग्य प्रमाण अमुक इतके टक्के असा नियम करणे शक्य नाही. हे माझे मत आहे.