जाता जाता (BTW चे मराठीकरण) एक शंका...
परभाषी की परभाषिक? व्याकरणातील वर्गीकरणाप्रमाणे परभाषी शिकल्याचे आठवते
महेशदादा आणि मृदुलाताईंशी एकदम सहमत, फार खटकत नाहीत तोवर स्वभाषी शब्द वापरा/पाडा (वापरत गेलो तर खटकणेही बंद होईल).
पण एखाद्या लेखात किती शब्द परभाषी असावे असे काही मोजमाप नाही करता येणार. अर्थात एखादवेळी परभाषी शब्द खूप खटकले तर लेखकाला याप्रमाणे खटकल्याचे कळवणेही आवश्यक आहे.
ज्या लेखाविषयी ही चर्चा चालू आहे, तो लेख वाचताना, खरोखर फार काही खटकले नाही. कारण संवाद सोडून इतर लिखाणात इंग्रजी शब्दांचा फार भरणा नव्हता.