कै. शं. रा. भागवत ... (काही पुरावे)

ह्या लेखात तुम्ही दुवा क्र. २ हा दुवा दिलेला दिसत आहे. त्याच्या सुरवातीला http:// हा भाग नसल्याने तो दुव्याच्या स्वरूपात दिसत नसावा.

त्या लेखात ह्याहून आणखी दुवे दिलेले आहेत असे दिसत नाही.

मनोगतावर आपण जेव्हा साहित्य प्रकाशनासाठी सुपूर्त करतो तेव्हा ते मनासारखे झालेले आहे की नाही ते वारंवार तपासून पाहावे अशी अपेक्षा गृहीत धरून पाठवण्याआधी वाचून पाहा ही सुविधा दिलेली आहे. शिवाय लेखनाचे स्वरूप मनासारखे होत नाही तोवर ते अप्रकाशितही ठेवता येते. त्यानंतरही (प्रकाशित केलेल्या) लेखाला पहिला प्रतिसाद येईपर्यंत आपण तो हव्या तितक्या वेळा आणि प्रकारे तो बदलू शकतो. समजा तेही होऊन गेले तरी प्रशासनास ईमेलने विनंती करून लेखात बदल करता येतात. प्रकाशित लेखन शक्य तितके निर्दोष असावे हीच ह्यामागची भूमिका आहे.

तुमचा वरील लेख तुम्ही लिहून प्रकाशित केल्याला आता दहा दिवस उलटून गेलेले आहेत. दुवे जर नीट दिसत नसले तर प्रशासनास ईमेलने कळवूनही बदलता आले असते. असो. आता तो दुवा नीट दिसेल अशा प्रकारे बदललेला आहे.

तुम्ही एक वर्षांहून अधिक काळ मनोगताचे सदस्य आहात आणि अनेक प्रकारचे लेखन प्रकाशित केलेले आहेत, त्यामुळे हे तुम्हाला माहीत नसेल असे म्हणायचे नाही; परंतु एक उजळणी म्हणून वरील माहिती दिलेली आहे.