ठाकरे बंधूंमध्ये जे वाद आहेत ते राजकीय आहेत. आपल्या सगळ्यांनाच हे माहित आहे की राज लहानपणापासून बाळासाहेबांबरोबर राजकारणात वावरला आहे. त्याला उद्धवपेक्षा राजकारण जास्त कळते असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होऊ नये. पण जेव्हा राजकीय वारशाचा प्रश्न उभा राहिला तेव्हा उद्धव केवळ मुलगा म्हणून लोकांच्या डोक्यावर बसवला गेला. तो तर आधी घरी आलेल्या कार्यकर्त्यांना भेटायचे सौजन्यही दाखवत नव्हता. आताच्या निवडणूकीनंतर तर शिवसैनिकांनी बाळासाहेबांना साकडे घातले आहे की आता तुम्हीच शिवसेना वाचवा. याचा अर्थ सरळ आहे की उद्धव लोकांना पटला नाही. त्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह लागले आहे.