श्री प्रभाकर,
आपण दिलेली पावभाजीची पध्दती करावयास सोपी आहे. एकदा करुन पाहीन. आपण दिलेल्या निरनिराळ्या पदार्थांच्या पध्दती खुप चांगल्या आणि उपयुक्त आहेत. धन्यवाद.
मी सर्व भाज्या म्हणजे बटाटा, मटार, कोबी, फ्लॉवर, सिमला मिरची, टोमॅटो कुकर मधुन शिजवून घेते आणि मग अगदी थोड्या तेलात आलेलसूण पेस्ट व कांदा गुलाबी रंगावर परतून घेते आणि मग सगळ्या भाज्या एकत्र करुन, घोटुन परतून त्यात तिखट, मीठ, धनेजीरे पावडर, पावभाजी मसाला घालुन नंतर त्यात बटर घालते.
रोहिणी