सहज सुचलं म्हणून..! येथे हे वाचायला मिळाले:
इथे आमच्या घरापासून दिड मिनीटाच्या अंतरावर एक डंकीन डोनट आहे. मला कधी अँटी-सोशलाईझिंगचा अॅटॅक आला, डोक्याला शॉट बसला (तो बसायला कुठलंही कारण पुरत.. :) ) , खरच कॉफी प्यायची खूपच तल्लफ आली किंवा काही वाचायचं असेल तर मी एखादं पुस्तक घेऊन तास-दोन तास तिथे जाऊन बसतो. तिथल्या माणसाला पण आता माझी स्मॉल कॉफी विथ क्रिम अँड शुगर आणि दोन चॉकलेट मचकीन ही ऑर्डर माहित झाल्याने अजिबातच काही सांगावं लागत नाही.. तिथे बाहेर पण टेबल खुर्च्या असल्याने हवा चांगली असली की मी बर्याचदा बाहेरच बसतो.. ओल्ड मिल्टन पार्कवे वरचा ट्रॅफिक बघत, येणार्या जाणार्या ...