सामान्यतः बहुसंख्य भारतीयांना अपरिचित असलेल्या इराणसारक्या देशातले तुम्ही लिहीत असलेले तुमचे अनुभव वाचायला रंजक आणि चित्तथरारक तर आहेतच पण ते सांगताना, विशेषतः तांत्रिक बारकावे समजावून सांगताना सोप्या आणि प्रवाही मराठीचा कटाक्षाने केलेला वापरही लक्षात घेण्यासारखा आहे.