थेट पॅरिस मधुन... येथे हे वाचायला मिळाले:
पहिल्या भागात व्हिएन्ना आणि बुडापेस्ट फिरुन आलो. आता पुढचा टप्पा होता साल्झबर्ग आणि इन्सब्रुक. सगळा प्रवास ऑस्टियन रेल्वेने, स्वस्त आणि मस्त! व्हिएन्नाला आल्यावरच पुर्ण प्रवासाचे आरक्षण केले होते. रेल्वे स्थानकांजवळची हॉटेल महिनाभर आधीच आरक्षित केले होते. साल्झबर्ग ही दादाची शिफारस होती तर इन्सब्रुकला स्वारॉस्की क्रिस्टल वर्ल्ड बघायला जायचं होतं.