खरंय प्रभाकर, आपल्या आयुष्यात अशे मित्र येतातच.  आणि गम्मत म्हणजे आपण त्यांना सर्वात अधिक त्रास देतो आणि अश्या लोकांना भाव देतो जे आपले जवळचे मित्र नसतात.
 
म्हणतात ना हातचे सोडून पळत्याच्या मागे धावणे.  म्हणून एकदा मी असाच विचार करत असतांना लिहिले होतेः
 
कधी जवळच्या मित्रा कडे
फक्त त्याच्या साठी जावे
आपली दुःखे आपल्या चिंता
सगळे तेव्हढ्या पुरते विसरावे
 
गेल्या गेल्या त्यास म्हणावे
तुझ्या साठी मुद्दाम आलो
तुझी आठवण येत होती
इतक्यात भेटही झाली नव्हती
 
तो सुखाने फुलून येईल
एकटेपणा विसरून जाईल
त्याचा उजळता चेहरा पाहुन
आपणही उजळून यावे
 
कधी जवळच्या मित्राकडे
फक्त त्याच्या साठी जावे
 
तुषार जोशी, नागपूर