"पेप्सोडेंट वापरणारी मुले", "बिल्डिंग क्र. १ व २." ही लाईफबॉयची जाहिरात, व तसे पहाल तर ९९% सर्वच जाहिराती, मानवी शरीराचे प्रदर्शन व खोट्यानाट्या गोष्टीनी भरलेल्या. मालिकांमधून तरी काय असते फक्त गुन्हेगारी त्यांची मूळ संहिता म्हणजे इंडियन पीनल कोड. बंधनहीन स्वातंत्र्य व कर्तव्यहीन हक्क म्हणजे सर्वनाश तेथेच आपली वाटचाल सुरू आहे. यावर उपाय तेवढाच जालीम हवा म्हणजे स्वातंत्र्यहीन बंधने व हक्कहीन कर्तव्ये येती ५० वर्षे. नाहीतरी हक्क स्वातंत्र्य हे सारे फार थोड्या निवडक लोकांसाठी. ९० - ९५ % लोकांस कसले हक्क व कसले स्वातंत्र्य. हे माझे मत. अर्थात सध्याचे पक्ष व नेते काय करणार. त्यासाठी तसाच बलदंड नेता हवा जसा चीन मध्ये माओ किंवा क्युबा मध्ये फिडेल कॅस्ट्रो.
(संपादित : प्रशासक)