आणि जिवंतपणा आणण्यासाठीं मीं वापरलेले आहेत.

आपण वेळ देऊन लेख वाचल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांच्या भावना मला समजल्या. नव्हे याबद्दल अभिमानच वाटला. परखड मतें अतिशय सभ्य भाषेंत व्यक्त केल्याबद्दल सर्वांचें अभिनंदन.

मराठी भाषेचा उपमर्द करणें हा माझा हेतू नव्हता. लेखातल्या जवळजवळ सर्व परभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द येतात आणि मीं एरवीं ते आवर्जून वापरतों. महाराष्ट्र शासनाशीं वा मुंबई महानगरपालिकेशीं पत्रव्यवहार करतांना मीं आवर्जून मराठींतच करतों.

पण संबंधित अधिकारी अमराठी असल्यामुळें व कायदेशीर संघर्ष असल्यामुळें इंग्रजी शब्द फार वापरलेले आहेत.

प्रथम अंक समितीला धन्यवाद देतों कारण त्यांनीं माझ्याकडून बरेच परभाषिक शब्द माझ्याकडून कमी करून घेऊन संख्या एक तृतियांशा केली.

यापुढें आपल्याला माझ्या लेखांत परभाषिक शब्द कमींत कमी आढळतील याची खात्री देतों.

सुधीर कांदळकर.