(हा एक सिद्धांत "ईतक्या दिवस कुठे होतास रे", आता पर्यंत आपण काय काय केले असते, नाही?)
. . . .
मैत्री व्हायला
काळवेळ नसते
मैत्री योगायोगाचा
खेळ असते
दोन वर्ष आधीच
भेटलो असतो तर?
तर काही बिघडलं असतं?
पण काय करणार?
योग नव्हता
त्याला (बाप्पा) ते आवडलं नसतं
बोलावसं वाटत होतं
हे आत्ता सांगतोस तू
मीही कबूल करतो मग
होता माझा तोच हेतू
पण कोणीच बोललं नाही
उगाच भाव खात होतो
प्रत्येक वेळी समोर आल्यावर
हॅलो! करून पुढे जात होतो
पण मैत्रीची
गम्मत असते
व्हायची तेव्हा
होतेच होते
क्षणात कुणालातरी
ते सुचते;
"मला तुझ्याची,
बोलायचे होते!"
मग काय बडबड
चर्चा होते
एकमेकांची
थट्टा होते
आपळ हळहळ
व्यक्त करतो
आधीच भेटायला
हवे होते
मने जुळली
हे नक्की असते
आता मैत्री
पक्की असते
मैत्री व्हायला
काळ वेळ नसते
मैत्री योगायोगाचा
खेळ असते
तुषार जोशी, नागपूर