वा! चित्तथरारक आहे हो अनुभव!!
ज्ञानाचे बीज फळाच्या गराने आवृत्त असते तसे तुमच्या लिखाणातील निखळ अनुभवजन्य ज्ञानाचे बीज स्वकर्तृत्वाच्या अभिमानाने आवृत्त आहे. त्यामुळे राजा बढेंच्या शब्दात मला असे सांगावेसे वाटते की
"पाहू दे, मेघाविण, सौंदर्य तुझे मोकळे"
तुम्ही लिहीता आहात त्यातील स्वतःपलीकडचे जग प्रेक्षणीय आहे.
तुमची आत्मकथा सुरवातीपासून वाचत आहे. पण सलगपणे नाही. त्यामुळे प्रतिसाद दिला नव्हता.
मात्र ज्या चिकाटीने तुम्ही इतके भाग लिहीले आहेत ती कौतुकास्पद आहे.