जेथे आवश्यक असतील तेथे इंग्रजी शब्द जरुर वापरावेत. लेखकाने लेखन प्रभावी कसे होईल , ते पाहावे. त्यात अमुक भाषेतले अमुक टक्के शब्द घाला असे बांधून ठेवले तर प्रभावी लेखन करणे अशक्य होईल. बोलताना लोक 'कोटेशन' असेच म्हणतात, त्याचे मारुनमुटकून 'निविदा' असे केले तर ते अनैसर्गिक वाटेल.
बाकी अशाने मराठी मरेल, मराठी संस्कृती मरेल हा न संपणारा मुद्दा आहे. अशाने मरण्याइतकी मराठी दुबळी नाही.