मी व्हीकेंशी अगदी सहमत आहे. आजकाल जाहिरात ही तारक असण्यापेक्षा मारकच जास्त असते. पण माझ्या मते हे एक दुष्टचक्र आहे. "अंगप्रदर्शन करणे ही जाहिरातीची किंवा सिनेमाची गरज आहे म्हणून आम्ही करतो" असे करणारे म्हणतात. आणि "लोकांनाच आवडते म्हणून आम्ही दाखवतो" असे दाखवणारे म्हणतात. पण यात नव्या, कोवळ्या पिढीचा विचार करणे ही मात्र  कोणाचीच गरज नसते.