भाषा हे साध्य आहे की साधन? संवादाचे साधन असे मानले तर बाकी चर्चा बिनकामाची ठरते. संवाद विशिष्ट पर्यावरणात होत असतो. त्या पर्यावरणानुसार भाषा आकार घेईल. मग त्यात इतर चार भाषांचाही (अन्य अनेक गोष्टींप्रमाणे) प्रभाव असणारच. त्याअर्थी भाषा ही शाश्वत नसतेच. नाहीही.