सदरहू लेख ही काल्पनिक कथा नाहीं. हें अनुभवकथन आहे. नांवें देखील न बदलतां केलेंले. जे शब्द, जी भाषा संबंधित पात्रांनी वापरले/ली होते/ती तसेंच्या तसें, पदरचें कांहींही तिखटमीठ न लावतां लिहिलेले आहे. जिथें भाषांतर/अनुवाद केला आहे तिथें तसें मीं इंग्रजी तोडलें वगैरे निवेदन दिलें आहे. अनुभवाचा बाज वा तीव्रता न बिघडवतां लिहिलेले आहे. मुंबईची बहूभाषिक व्यापारी भाषा ही अशीच एकमेकांस निरोप/भावना नेमक्या समजण्यासाठीं भाषांची सरमिसळ करून वापरली जाते. त्यामुळें गैरसमज टळतात. साहाजिकच या भाषेंत प्रचलित नसलेले शब्द वापरणें हें अनैसर्गिकच ठरेल. म्हणूनच इतके परभाषी शब्द आलेले आहेत.

कोटेशन म्हटलें जातें म्हणून कोटेशन लिहिलें. निविदा हा शब्द मला येत नाहीं वा मराठीचा उपमर्द करणें हा हेतू असणें असा त्याचा अर्थ नाहीं. उद्यां यांपैकीं एखाद्या अधिकाऱ्यानें हें वाचून माझ्यावर बदनामीचा वा अब्रूनुकसानीचा खटला भरलाच तर मूळ शब्दांत बदल होऊं नये यासाठीं ही कायदेशीर सल्लागाराच्या सल्ल्याप्रमाणें खबरदारी घेतलेली आहे. असो. वाद टाळण्यासाठीं यापुढें परभाषी शब्दांचा भरणा असलेले अनुभव न लिहिणें माझ्यापुरतें तरी बरें हें खरें. इतरही असे बरेच मनोरंजक अनुभव आहेत ज्यांत सर्व शब्द मराठी आहेत. वाचकांचें असेंच प्रेम राहिलें तर पुढें कधींतरी जरूर वाचायला मिळतील.

धन्यवाद.

सुधीर कांदळकर.