त्या वेड्या लोकांच्या तावडीतून सुखरूप आलांत हें एक आश्चर्यच आहे. या पार्श्वभूमीवरचीं दोन पुस्तकें आठवलीं.

१. केन फॉलेटचें अंडर द विंग्ज अशा कांहींशा नावाचें, नक्की नांव आठवत नाहीं.
२. फिरोझ रानड्यांचे अफगणिस्तानच्या तालिबानीकरणाच्या उंबरठ्यावरचें. दुर्दैवानें याचेंहिं नांव आठवत नाहीं.

दोन्हीं पंधरा एक वर्षांपूर्वीं वाचलेलीं. फिरोझ रानडे तर त्यांच्या दाढीमुळें हल्लेखोराचा ते पाकिस्तानी मुस्लिम आहेत हा गैरसमज झाल्यामुळें बचावले असें कांहींसें आठवतें.

पुन्हां अशा मॉब रूलनें कबजा घेतलेल्या जमावाच्या वा धर्मवेड्यांच्या वाटेला जाऊं नका.

सुधीर कांदळकर