तुमचे आत्मचरित्रात्मक लेखन वाचत आहे. तुमची लिहिण्याची शैली अगदी रोखठोक आणि अनुभवाधिष्ठित आहे. शिवाय समस्येकडे पाहण्याची तुमची चिकित्सक, विश्लेषणात्मक दृष्टीही दिसते.
टक्केवारीच्या जगात ९० टक्के जोड्या अपघाताने पालक झालेले असतात, ८ टक्के थोडेफार फरकाने ठरवून पालक झालेले असतात, दोन टक्के लोक योजना बद्ध, तन, मन, धन व काळ ह्या सगळ्याचा विचार करून मोठ्या दिमाखाने पालक होण्याची फळे चाखतात.
९० टक्के जोड्या अपघाताने पालक होतात ही आकडेवारी फार कुतूहलजनक आणि (मला तरी) धक्कादायक आहे. ही आकडेवारी आपल्याला कोठे वाचायला मिळाली ते कळले तर अधिक खोलात जाऊन पाहता येईल.
सहज शक्य असल्यास अधिक माहिती द्यावी. धन्यवाद.