Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog येथे हे वाचायला मिळाले:
हळू हळू गणेशरावचे मधुराणीच्या बंगल्यावर जाणे वाढले. त्यांच्यात आता अमुलाग्र बदल झाला होता. त्यांचा पेहरावही आता कायमचा बदलला होता. खादीचा पांढरा सदरा आणि पायजामा. स्थुल शरीरातही आता तल्लखपणा येऊ लागला होता. त्याचं सकाळी नियमित व्यायाम करणं, फिरायला जाणं सुरु झालं होतं. पूर्वी त्यांना घरात ना पोरगा ना बायको कधी भ्यायची ते आता वचकून राहू लागले होते. पोरगा वचकून राहण्याचं कारणही तसंच होतं. मधुराणीकडे त्यांनी त्याचे प्रकरण लावून धरुन त्याला नगरपालिकेत चिकटवून दिले होते. पोरगा ही नोकरी लागल्यामुळे खूश होता आणि बायकोही नवऱ्याला उतरत्या वयात का ...