विचार छान आहेत. अनुभवले पण आहेत.
पण तरीही या लिखाणाला कविता म्हणणे आमच्या अल्पबुद्धीला तरी अवघड दिसते आहे.
हे असेच असे गद्यात पण लिहिता आले असते... उलट असे वाटते आहे की गद्य लिहून तुकडे केले आहेत.
मनोगतावर अनेक जाणकार आहेत. इथे कोणता छंद किंवा वृत्त वापरले गेले आहे हे समजेल तर बरे होईल. म्हणजे आम्हालासुद्धा आपल्या सर्वांप्रमाणे रसग्रहण करायचा आनंद मिळेल.
हा उपहास नव्हे. हवे तर आमचे अज्ञान समजा!