वेदना समजण्याची क्षमता, हा मी समज करून घेतलेला अर्थ, शब्दार्थ जाणकारांनी दुरुस्ती करावी त्यांचे स्वागत.

आपला अर्थ थोडासा मर्यादित वाटतो. मी याचा व्यापक अर्थ

१. दुसऱ्याच्या विचार आणि भावना समजण्याची क्षमता आणि त्याहून महत्त्वाचे

२. आपल्या वागण्या - बोलण्याचा दुसऱ्याच्या मनावर, विचारांवर काय परिणाम होईल हे जाणून आपले विचार त्याच्या भावना न दुखावता त्याच्यापर्यंत पोचवण्याची क्षमता

असे समजतो.

यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट सदसद्विवेकबुद्धी. चांगले आणि वाईट, योग्य आणि अयोग्य, बरोबर आणि चूक, न्याय्य आणि अन्याय्य हे ठरवण्याची क्षमता ही सर्वात महत्त्वाची आहे. किंबहुना सदसद्विवेकबुद्धी ते मनुष्य जिवंत असल्याचे लक्षण मी समजतो. जो मनुष्य सदसद्विवेकबुद्धीशी प्रामाणिक नाही तो जिवंतच नाही असे मी मानतो.

दुसरे म्हणजे माझे एक निरीक्षण आहे की पालक आपल्या मुलांमध्ये भेदभाव करतात आणि त्याचे परिणाम मुलांच्या मनावर  होतात. काही उदाहरणांमध्ये जिथे तीन अपत्ये आहेत त्यांच्यामध्ये थोरल्याचे थोरला म्हणून आणि धाकट्याचे शेंडेफळ म्हणून लाड होतात आणि मधले अपत्य दुर्लक्षित राहते. (मी तिघांमध्ये थोरला आहे आणि माझे बरेच लाड झाले तरीही मधल्या भावाच्या बाबतीत जे झाले तसे इतरत्रही पाहिले आहे).

विनायक