माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
“तुझी माझी मैत्री पुरे झाली आता
जा ग सखे सोडूनी जा आता.”
तिची माझी ओळख कॉलेज मध्ये शिकत असतांना एका मित्राने घडवून दिली होती. मी इंदोर मधील गोविंदराम सेक्सरिया इन्जिनिअरिन्ग कोलेज मधून BE केलय Electrical मध्ये. १९८०-८१ मधील गोष्ट असावी जेव्हा माझा एक मित्र ज्याचं नाव होत राजेश श्रीवास्तव (एक महाभाग होता तो) त्याने तिची ओळख करून दिली होती. त्याचा फोटो हा बघा.
हाच तो महाभाग
. ह्या महाभागाच एका मुलीवर प्रेम होत.(अस तो सांगायचा मी काही बघितले नव्हते त्या ...