शीर्षक उत्तम! लेखही आवडला. संवाद एकदम प्रवाही आहेत. प्रश्नही खराच आहे म्हणा!
दूरसंचावरील मालिकांनी संसारावर केलेले आक्रमण अत्यंत खरे आहे.
ते थांबवता येईल असे वाटत नाही.
त्यात पुन्हा कौटुंबिक विषय असल्याने तर ज्येष्ठ स्त्रियांना ते फारच आपलेसे होतात.
मनोरंजन हा जर त्यांचा एकच हेतू असेल तर मनोरंजनाचे इतर काही उपाय करता येतील का हे बघता येईल. पण अर्थातच हा लेख 'गद्यसाहित्य' या सदरात असल्यामुळे लेखिकेला वाचकांकडून उपायांची अपेक्षा नसावी.