कसं असतं केदार,

आपण पुलंची सगळी पात्रं वाचलीत. ती वाचताना त्या "व्यक्तिरेखेत" गुंतून जातो. ती आपलीशी वाटायला लागते. आणि मग त्या व्यक्तिबद्दल काही शोध वगैरे घ्यावा, ह्या व्यक्तिरेखेचं मूळ कुठलं, कुठल्या सत्य व्यक्तिरेखेतून हे साकारलं असेल.... वगैरे प्रश्नांना जागाच देऊ नये असं वाटतं आणि हे वाटणं सातत्यपूर्ण असतं म्हणजे कधीही या व्यक्तिरेखेबद्दल प्रश्न वगैरे नको काढायला असं वाटू लागतं.
म्हणजे असं, की समजा एखादी अत्यंऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽत सुंदर मुलगी दिसली, एकदा नव्हे अनेकदा, तरी आपण हा काही विचार करीत बसत नाही की ही काय खात असेल, कुठली सौंदर्यप्रसाधनं वापरत असेल, हिची आई वडील कोण, ते काय करतात. वगैरे वगैरे...... अगदी, कुणी सांगितलं असेल तरी आपण हे प्रश्न मनात आणूच शकत नाही कारण ती मुलगीच इतकी सुंदर असते की त्या सौंदर्यापुढं एकतर हे प्रश्न नकोही वाटतात आणि आपण त्यांना थाराही देत नाही....

एक लक्षात घ्या केदार, मी "तुमचा प्रश्न चुकीचा आहे" असं म्हटलेलं नाही, पण उत्तरासाठी वाचकांना त्या सौंदर्यानूभूतीतून बाहेर तर येऊ द्या पूर्णपणे!!!! रस संपला असं म्हणणं -तेही पुलंच्या बाबतीत- हे म्हणजे- श्वास घ्यायचा कंटाळा आला? असं विचारल्यासारखं झालं......

जेव्हा जेव्हा "सौंदर्य" पुढ्यात येईल तेव्हा मनुष्य त्या सौंदर्यातच हरवून जाणार.. की प्रश्न विचारत बसणार?काय, कधी, कुठं, कसं....