चक्रधर, प्रतिसादासाठी धन्यवाद! मलाही हेडफोनचा पर्याय आवडला.

संजोप, आपण लिहिलेला लेख वाचला. या मालिकांनी एकूणच आयुष्याला वेढा घातला आहे. तुमचा लेख वाचल्यावर इंग्रजी ’वॉली’ या चित्रपटाची आठवण झाली.

बेफिकीर, या विषयावर चर्चा होणे गरजेचे आहेच. मात्र, हा लेख मी माझ्या ब्लॉगवर आधीच लिहिलेला होता. दुवा क्र. १ लेख मी येथे कॉपी पेस्ट केलेला आहे आणि गद्य साहित्य प्रकारात मोडतो म्हणूनच ’चर्चा’ या सदरात टाकणे प्रशस्त वाटले नाही.

कुल्कर्निअप्पा, नेमकं हेच होत आहे. आपण सिरियल पाहता पाहता सिरियल मधलं आयुष्य जगायला सुरूवात केली आहे. सिरियल ही अर्ध्या तासाची करमणूक म्हणून  गृहीत धरली तर ठीक असतं पण असे खून आणि जादूटोणा दाखवणाऱ्या सिरियल करमणूकप्रधान तरी कशा म्हणायच्या?