Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog येथे हे वाचायला मिळाले:

संध्याकाळचे सात वाजले असतील. मधूराणी आपल्या गॅलरीत आरामखुर्चीवर आरामात बसली होती. तेवढ्यात तीचा एक कार्यकर्ता तिच्याजवळ येवून उभा राहाला.
'' काय आहे?'' तिने चाहूल लागताच, त्याच्याकडे न वळता विचारले.
'' राणीसाहेब... खाली एक माणूस आपल्याला भेटायचा आग्रह करतो आहे..'' तो कार्यकर्ता म्हणाला.
'' भेटण्याची वेळ संपलेली आहे .. आणि यावेळी मी कुणालाही भेटत नाही.. '' मधूराणी म्हणाली.
'' पण तो जात नाही आहे... वाद घालतो आहे... भांडण करतो आहे.. अगदी मारावरीवरसुद्धा आला होता तो.. माफ करा पण.... सारखा मला मधीला भेटायचं... मधीला भेटायचं असं ओरडतो ...
पुढे वाचा. : - - भूतकाळ