Computer & Internet Info येथे हे वाचायला मिळाले:
कम्प्युटर घरी आणताना त्यात कोणती प्रणाली असावी याचा विचार ग्राहकाला करावा लागतो. बहुतांशपणे विंडोज सिस्टिमच बसविली जाते. नाही म्हणायला याला पर्यायी लिनक्स सिस्टिम उपलब्ध आहे; पण ती अजून म्हणावी तशी लोकप्रिय नाही. सध्या विंडोज एक्सपी ही सर्वात चांगली समजली जाते. मायक्रोसॉफ्टने ती ५ वर्षांपूर्वी बाजारात आणली. ती लगेचच लोकप्रिय झाली. याचे मुख्य कारण ती ’यूजर फ्रेंडली’ आहे. कम्प्यूटरचे कमी माहिती असणाऱ्यालाही ती उत्तम मार्गदर्शक ठरते. या मायक्रोसॉफ्टने बराच गाजावाजा करून आणि कोट्यवधी डॉलर खर्चून विंडोज विस्ता ही प्रणाली बाजारात आणली आहे. ...