विषय पुलंचा आणि एकही प्रतिसाद नाही, ही अवस्था पाहून माझ्या मनात महाराष्ट्राच्या 
सांस्कृतिक भवितव्याबाबत चिंता उत्पन्न होऊ लागल्या होत्या. :)
आपल्या प्रतिसादाने चिंता दूर झाली. 
आपले म्हणणे अगदी बरोबर! आपल्यापैकी कुणालाच त्या व्यक्तींच्या सौंदर्यानुभूतीतून बाहेर यावंसं वाटत नाही. 
तरीही, साहित्य कितीही ललित असलं आणि सौंदर्यानुभूतीतून बाहेर यावंसं वाटत नसलं तरी त्या सौंदर्याची केव्हातरी चिकित्सा होतेच. 
आज मला प्रश्न पडला. काल कोणाला तरी पडला असेल. उद्या आणखी कोणाला तरी पडेल. 
अत्यंssssssssत सुंदर मुलगी असली तरी वाटतंच की, तिने तसा पेहराव केला असता तर ती अधिक सुंदर दिसली असती. का बुवा तिने असा पेहराव निवडला ?
तुमचा प्रतिसाद काबिले तारीफ.