हें भाग्याचेंच. बॉबवर शेंडीभोंवती बांधलेलें गजऱ्याचें चक्र नारदमुनीसारखें दिसायचें कां हो? माझ्या छोट्या बहिणीचें दिसायचॅं.

आम्ही जसे आमच्यासाठी गजरे करायचो त्यात अजून एक गजरा प्लॅस्टिकच्या पिशवीत घेऊन जायचो, कधी आमच्या मैत्रिणींकरता तर कधी शाळेतल्या बाईंकरता
आनंद वाटून घेणें आवडलें.

त्यातही आमची भांडणे " ए काय गं, किती काढतेस गं कळ्या! मला काढू देत ना थोड्यातरी! "अगं होना काढ की मग! ह्या बाजूच्या मी काढते तू दुसऱ्या बाजूच्या काढ. " मग स्टूल एक्या जागेवरून दुसरीकडे न्यायचो.

सुरेख. मीं बालपणीं सुटींत आजोळीं असतांना माझी एक माझ्याच वयाची मामेबहीण - वय सुमारें पांच वर्षें - एवढी प्रेमळ आणि समजूतदार होती कीं पारिजातकाचीं फुलें वेचतांना ती परडी मला देखील कांहीं वेळ धरायला देत असे. ती आठवण तीव्रतेनें जागृत झाली. या माझ्या आयुष्यांतल्या पहिल्यावहिल्या आठवणी आहेत. त्यापूर्वीचें मला कांहींही आठवत नाहीं. माझ्या देखील बालपणींच्या अमूल्य क्षणांचा आनंद मला पुन्हां दिल्याबाबत अनेक धन्यवाद.

सुधीर कांदळकर