हा वेगळाच अनुभव आहे. प्राण्याच्या प्रतीक्षेचे ते निशःब्द क्षणही थरारक असतात. आपणही छान टिपले आहेत. खास करून आपण कढीलिंब पाहातांना इतरांच्या प्रतिक्रियेचे.
आपल्याला बरेच प्राणी दिसले. नशीबवान आहांत. किती वेळ जंगलांत फिरलांत तें लिहिलेलें नाहीं.
रानातल्या मातीचा, झाडाझुडुपांचा, गवताचा गंध, वेळ पहांटेची वा रात्रीची असल्यास ती गारव्याची शिरशिरी, दुपारीं सावलीबाहेर बसणारे उन्हाचे चटके, हें सगळें आपला लेख वाचतांना पुन्हां आठवलें.
धन्यवाद. पुढील लेखनासाठीं शुभेच्छा.
सुधीर कांदळकर