सदस्यांनी ह्या विषयावर अनेक सुचवणी आणि विनंत्या केलेल्या आहेत आणि प्राथमिक स्वरूपात वेगवेगळ्या चाचण्या करून झालेल्या आहेत. चित्रे अंतर्भूत करण्याची सुविधा वेगवेगळ्या प्रकारे करता येण्यासारखी आहे आणि प्रत्येक प्रकारात काही फायदे आणि तोटे आहेत. सगळ्याचा विचार करून मनोगताच्या पुढच्या ऊर्ध्वश्रेणीकरणाच्या वेळी हे करण्याचा विचार होता. मात्र ड्रुपलचे ऊर्ध्वश्रेणीकरण अपेक्षेपेक्षा लांबल्याने आता त्याची वाट न पाहता मनोगतावर ही सुविधा कशा प्रकारे कार्यान्वित करता येईल त्याचा विचार चालू आहे.

सर्व प्रकारच्या सुचवणींचे स्वागत आहे.
धन्यवाद.