अश्या परिस्थितीत "मी मतं (काँग्रेस - राष्ट्रवादीला) का दिलं, असा विचार सामान्य नागरिकाच्या मनात येत असेल का?
असे काही होत असेल असे वाटत नाही. जर होत असेल तर ते फक्त ३८ टक्के लोकाचे होऊ शकेल. कारण;
विधानसभेला सरासरी मतदान जेमतेम ५० टक्के झाले आहे. या झालेल्या मतदानाच्या २१ टक्के फक्त कॉग्रेसला व १७ टक्के राष्ट्रवादीला झालेले आहे. त्यामुळे हे सरकार महाराष्ट्रातील जनतेचे खरेखुरं प्रतिनिधित्व करतात असे म्हणता येत नाही. ज्यांनी मतदान केले त्यांचा विचार करता हे सरकार ३८ टक्के लोकांचे प्रतिनिधित्व करतात असे म्हणता येईल. महाराष्ट्रातील एकूण मतदारांचा विचार करता ही टक्केवारी फक्त १९ टक्के येते.