आपला आग्रह समजू शकतो. पण तो इथं कितपत लागू होईल याची शंका आहे.
परछाईया या शीर्षकामागे कथावस्तूत एक कारण दडलं आहे. परछाईया या गझलांच्या कार्यक्रमावेळी नायक-नायिकेचं मैत्र सुरू होतं. त्या कार्यक्रमानंतर सुरू झालेला हा प्रवास वाटा वेगळ्या होण्याकडे जातो. पण परछाईया कायम राहतात हे या नायकाचं मनोगत आहे. त्यामुळंच तो शेवटी म्हणतोय देखील की, त्यावेळच्या 'ले चला जान मेरी...'चा आस्वाद आता पुन्हा त्यासारखा होणार नाही. हीच ती परछाई त्याच्यावर घेरून राहते. (इथं सावल्या हा शब्द पुरेसा अनुरूप होत नाही, असे माझे मत आहे.)
माझ्या मते हे स्पष्टीकरण आपल्याला पटावे.