हा लेख वाचून माझे शाळेतले दिवस आठवलेत. आमच्या अंगणातसुद्धा जाई-जुई, चमेलीच्या वेली होत्या. मी अशीच रोज शाळेत जाताना माझ्या वीतभर 'पोनीटेल'ला फक्त फूटभरच नाही तर चांगला ४-५ फूटभराचा गजरा माळून जायचे. आई रोज संध्याकाळी कळ्यांचा गजरा गुंफून ठेवायची.
रात्रीच्या वेळी अंगणात येणारा या फुलांचा मंद-मंद सुगंध तर अजूनही जसाच्या तसा स्मरणात आहे. इकडे बंगलोरातसुद्धा एखाद्या फूलवालीजवळून जाताना जर या फुलांचा सुगंध आला तरी क्षणभर घराच्या अंगणात आल्यासारखं वाटतं.
लेख तर छान, हलका-फुलका आहेच आणि पुढचा बराच वेळ आता स्मरणरंजनात जाणार...