स्वतःला बदलायचे ठरवले तर काही पैसे न लागता ते करता येईल.
पण प्रशिक्षणातून असे होते की आपल्यासारखेच आणखी लोक आहेत हे समजते. धीर येतो. मनात दाबून टाकलेले विचार बाहेर पडल्यावर बरे वाटते आणि विचारांची धार परत वाहू लागते.
मी स्वतः अशा कोणत्या प्रशिक्षणात सहभागी झाले नाही आत्तापर्यंत. बऱ्याच वर्षांपूर्वी एक सहकारी या शिबिराला गेला होता. तो आपल्या वडिलांशी तोपर्यंत १८ वर्षे बोललेला नव्हता. वयाच्या पाचव्या वर्षी त्याच्या आईचे निधन झाले व त्यानंतर त्याने वडिलांशी बोलणे सोडले (किंवा दूर गेला) असे काहीसे समजले. तर या प्रशिक्षण शिबिरानंतर तो वडीलांशी बोलला वगैरे.
कोणाला फायदा होईल कोणाला नाही. लोक स्वतःचे पैसे घालून जाताहेत ते आपण किंवा कोण कसे थांबवणार. ही एक प्रकारची अंधश्रद्धा आहे असे म्हणता येईल फार फार तर. इतकेच.