Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog येथे हे वाचायला मिळाले:

शंकर काही क्षण खुर्चीवर बसला आणि एकदम उठून मधूराणीच्या पायाशी लोळण घेवू लागला, '' मलं माफ कर मधे... मले माफ कर... म्या माह्या कर्माचे फळं भोगले हायत आता... गावातून गेलो तव्हापासून वन वन भिकाऱ्यासारखं फिरतूया...आताबी बघ चार दिस झाले पोटात एक अन्नाचा कन नाय...''
मधूराणीला त्याने जे केले त्याबद्दल ना राग होता ना कोणत्या दुसऱ्या प्रकारच्या भावना होत्या. तेव्हापासूनच तर तिने भावनांना कधी थारा दिला नव्हता, नव्हे भावनेला थारा न द्यायचं ती शिकली होती. मधूराणीने त्याला खांद्याला धरुन उठून उभे केले. तिला जाणवले की त्याच्या खांद्यावर हात ठेवताच ...
पुढे वाचा. : - - - त्या जुन्या भावना